All deleted tweets from politicians

Chief Minister of Maharashtra

This may be an incomplete list. If you think we're missing someone, please send us their Name, Country/State, Political Party, Office they hold or are seeking and, of course, Twitter handle. Thanks!

लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश करणार्‍या सर्व नवोदित खासदारांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. नवभारताच्या निर्मितीतील या प्रवासात प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. पक्ष कोणताही असो,आपले ध्येय एकच असले पाहिजे. परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं,समर्था भवत्वाशिषा ते भृशम्.. ॥भारत माता की जय॥

आणि यापुढेही राहील, हा विश्वास त्यांच्या मनात आहे, याकडेच या जनादेश निर्देश करतो. त्यांचा हा विश्वास सरकार निश्चितपणे सार्थ ठरवेल. #VijayiMaharashtra

आज आपले राज्य दुष्काळाला सुद्धा सामोरे जातेय्. त्यामुळे काही प्रमाणात घालमेल असताना सुद्धा राज्यातील जनतेने जो कौल दिला, तो निश्चितपणे मोलाचा आहे. हेच सरकार या दुष्काळातही आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे ...

आज महाराष्ट्रातील जनादेश सुद्धा जनमानसाचा भाजपावर आणि या नव्या कार्यसंस्कृतीवरील विश्वास अधोरेखित करणारा आहे. मतदारांनी जो भक्कम विश्वास दाखविला, त्याला सार्थ ठरविण्याचे काम येणार्‍या काळात सुद्धा केंद्रातील आणि राज्यातील सरकार करेल, हा विश्वास यानिमित्ताने देतो. #VijayiBharat

2014च्या जनादेशाने तर भाजपाला282चे निर्विवाद बहुमत दिले. पण गेले5वर्ष जितक्या गतीने गरिब कल्याण व समाजातील सर्व घटकांचा विचार केला गेला,तितका यापूर्वी कधीही झाला नव्हता बहुमताने गर्वाची नाही,जबाबदारीची,कर्तव्यतत्परतेची पेरणी झाली. गेल्या 5वर्षांतील याच बिजारोपणाचे फळ आज पाहतो आहे

2खासदारांचा पक्ष सत्तेपर्यंत आणून बसविला.मला अभिमान आहे,मी त्या पक्षाचा पाईक आहे,ज्याने कधीही सत्ता हे साध्य मानले नाही,सेवेचे माध्यम म्हणून स्वीकारले.प्रसंगी विरोधी पक्षात बसावे लागले तरी चालेल.पण,तत्त्वांशी तडजोड कधी केली नाही.सत्तेचा विचार केला तो लोककल्याणासाठीचे साधन म्हणून.

एका व्यक्तीने ठरविले तर परिवर्तन घडून येऊ शकते,हे मोदीजींनी या माध्यमातून सिद्ध केले. हा जनादेश या सिद्धतेची सिद्धी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 31% मतांची झेप या निवडणुकीत 42टक्क्यांवर गेली,हे यश साधे नाही. भारतीय जनता पार्टीच्या यशात अनेक नेत्यांनी मोठे योगदान दिले.

... आणि हेच परिवर्तन स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर प्रथमच या देशातील जनता अनुभवत होती. आजचा हा घवघवीत जनादेश हा त्याचा परिपाक आहे. #VijayiBharat #VijayiMaharashtra #ModiPhirse

स्वच्छ भारत अभियान असो, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा, उज्वला, उजाला अशा कितीतरी योजनांतून सुमारे 30 कोटी लोक प्रत्यक्ष लाभान्वित झाले. प्रत्यक्ष लाभ दिल्याने थेट खात्यात पैसे, त्यामुळे मध्यस्थाची यंत्रणा पूर्णत: संपलेली होती...

पोलपंडितही त्याला अपवाद नव्हते. जाती-पातीचे, वेडेवाकडे व्हीडिओ तयार करून खिल्ली उडविण्याचाही प्रयत्न झाला. पण, एक बाब त्यांच्या नजरेत एकतर येत नव्हती अथवा येत असेल तरी ती मुद्दाम दुर्लक्षित केली जात होती, ती म्हणजे या सरकारच्या माध्यमातून लाभ झालेल्या प्रत्यक्ष लाभार्थींची !